Maval: वादळी वाऱ्याने पॉलीहाऊसचे मोठे नुकसान

nisarga cyclone Major damage to the poly house due to strong winds in maval

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळाचा फटका मावळ तालुक्याला मोठयाप्रमाणात बसला आहे. प्रामुख्याने शेतातील सर्वच पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. विशेषतः पॉलिहाऊस, पोल्ट्री फार्म, नर्सरी जमीनदोस्त झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यामध्ये वडगाव मावळ येथील शेतकरी सुधीर वहिले यांच्या सांगवी (मावळ) शेतातील पॉलिहाऊसचे सुमारे ३ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये गुलाबाच्या झाडांची लागवड केलेली होती.

परंतु अचानक आलेल्या या वादळाने त्यांचे पॉलिहाऊसचे संपूर्ण शेड उडून जाऊन त्यामध्ये असणाऱ्या पिकांचेही नुकसान झाले आहे.

याआधी लॉकडाऊनमुळे त्रस्त शेतकऱ्यावर वादळी वाऱ्याचेही संकट बळीराजावर आल्याने बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला असून त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

आत्तापर्यंत सलग तीन महिने कोरोनामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात चक्रीवादळामुळे त्या नुकसानीत अधिक भर पडली आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.