_MPC_DIR_MPU_III

Nishikant Kamat Passed Away : ‘डोंबिवली फास्ट’, ‘दृष्यम’चे दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. : Nishikant Kamat, director of 'Dombivali Fast' and 'Drushyam' has passed away

एमपीसी न्यूज – ‘डोंबिवली फास्ट’ ‘मुंबई मेरी जान’, ‘दृश्यम’, ‘फोर्स’, ‘मदारी’ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत (50) यांचे निधन झाले.

_MPC_DIR_MPU_IV

हैदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना यकृताचा आजार होता, दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

निशिकांत कामतचा मृत्यू झाला आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा होती पण सध्या ते आयसीयूमध्ये आहेत असं हॉस्पिटलने सांगितलं होत. अभिनेता रितेश देशमुख याने सुद्धा त्यांच्या मृत्यूची बातमी खोटी असून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यची विनंती केली होती.

मात्र, रितेश देशमुख याने स्वत:च याची माहिती देत ‘तुझी खूप आठवण येईल’ असे ट्वीट करत निशिकांत कामत यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

_MPC_DIR_MPU_II

अभिनेता अजय देवगन याने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली असून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला आहे.

त्याआधी डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्यानंतर निशिकांत कामत हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचीत झालं.

डोंबिवली फास्ट चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याव्यतिरीक्त जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका केली होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.