National : महाराष्ट्रातून या खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…

एमपीसी न्यूज – मै नरेंद्र दामोदरदास मोदी शपथ लेता हूँ, असे म्हणत मोदी यांनी दुस-यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा  राष्ट्रपती भवनात सुरू आहे. मोदीनंतर महाराष्ट्रातून नितीन गडकरी प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, शिवसेनेचे अरविंद सावंत, आरपीआयचे रामदास आठवले यांनीही शपथ घेतली.

_MPC_DIR_MPU_II

या सोहळ्यासाठी तब्बल सहा हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. यामध्ये बॉलिवूडच्या तारे-तारकांचाही समावेश आहे. सुपरस्टार रजनीकांत, अभिनेते कमल हासन यांच्यासह कंगना रणौत, शाहरूख खान, करण जौहर, संजय लीला भन्साळी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

शपथविधीसाठी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, भूतान यांचा समावेश असलेल्या ‘बिमस्टेक’ देशांचे प्रमुख येणार आहेत. २०१४ च्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण होते. मात्र या वेळी पाकिस्तानला वगळण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग शपथविधासाठी उपस्थित राहिले आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.