Metro News : नितीन करीर महामेट्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक

एमपीसी न्यूज – महामेट्रोचे (Metro News)  व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा महामेट्रोतील कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) डॉ. नितीन करीर यांच्याकडे सोमवारी (दि. 15) पदभार सोपवला.

डॉ. ब्रिजेश दीक्षित मागील आठ वर्षांपासून महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. नागपूर मेट्रोचा टप्पा एक त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाला. आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. दीक्षित यांच्याच कार्यकाळात पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली.

UPSC : यूपीएससीकडून पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे (Metro News) काम करत असताना संरक्षण विभागाकडून जागा मिळवणे, पिंपरी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, हडपसर आणि इतर मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले. पिंपरी ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेज या दरम्यान मेट्रो देखील त्यांच्या कार्यकाळात धावली.

गरवारे कॉलेज, नळ स्टॉप या मार्गावरील दुमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी पुण्याच्या गर्दीतील रस्त्यांवरून मेट्रोमार्ग बनवण्याचे आव्हानात्मक कामही त्यांच्या कार्यकाळात झाले. नागपूर मेट्रोचे नाव सर्वात लांब बहुस्तरीय उड्डाणपूल यासाठी गिनीज बुक मध्ये नोंद झाली, यातही त्यांचे श्रेय आहे.

पुणे आणि नागपूर शहरातील जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत त्यांनी महामेट्रोच्या (Metro News) पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Pimpri : साद देती हिमशिखरे; हिमालय सफरीचा अनुभव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.