Pune : कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून केली दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून फोन द्वारे  वैयक्तिक माहिती मिळवून बँक अकाऊंट मधील दीड लाखांची रोकड परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका 72 वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांच्या एअरटेल कंपनीच्या सिमकार्डला नेटवर्क येत नसल्यामुळे त्यांनी कस्टमर केअरला फोन लावून तक्रार नोंदवली. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल वरून फिर्यादी यांना फोन करून कस्टमर केअर मधून दिपक आणि अरुण कुमार बोलत असल्याचे सांगितले आणि फिर्यादी यांची फोनवर वैयक्तिक माहिती घेतली.
या माहितीच्या आधारे अज्ञातांनी फिर्यादी यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधी  मधील 67 हजार रुपये आणि आयसीआयसीआय बँक खात्यामधील 1 लाख रुपये अशी एकूण एक लाख 67 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून परस्पर काढून  फिर्यादीची फसवणूक केली आहे .
याप्रकरणी दोन अज्ञात मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अलंकार पोलिस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.