BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : महापालिका जुन्या बोअरवेल दुरूस्त करणार; पंधरा लाखाचा खर्च 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या विविध उद्यानाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या बोअरवेल दुरूस्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गरजेनुसार नवीन बोअरवेल देखील घेण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 14 लाख 99 हजार 792 रुपये खर्चाला आज (बुधवारी) स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील विविध उद्यानांसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या बोअरवेल दुरूस्त करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गरजेनुसार नवीन बोअरवेल देखील घेण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका उद्यान विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या.

एक वर्ष मुदतीच्या कामासाठी 14 लाख 99 हजार 792 रुपयांची निविदा महापालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार जीवनधारा ट्यूबवेल कंपनी, इंद्रायणी बोअरवेल सर्व्हिसेस आणि साईकृपा बोअरवेल सर्व्हिसेस या तीन ठेकेदार कंपन्यांतर्फे निविदा सादर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जीवनधारा ट्यूबवेल कंपनी यांच्याकडून सादर झालेल्या निविदेचा दर महापालिकेच्या दरापेक्षा एक टक्का कमी होता. त्यांनी जुन्या बोअरवेल दुरूस्तीचे काम, तसेच गरजेनुसार नवीन बोअरवेल घेण्याचे काम 14 लाख 84 हजार 794 रुपयांमध्ये करण्याचे मान्य केले. त्यामुळे जीवनधारा ट्यूबवेल कंपनी या कंपनीकडून हे काम करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

HB_POST_END_FTR-A2

.