Talegaon Dabhade News : सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव नामंजूर 

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील सुदवडीच्या सरपंच रंजना बाळासाहेब शेंडे यांच्या विरुध्द दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेत ६२ मतांच्या फरकाने बारगळला.

सातपैकी सहा ग्रा.पं.सदस्यांनी दाखल केलेला सदर अविश्वासाच्या ठरावाबाबत १७डिसेंबर रोजी मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं.ची विशेष सभा पार पडली. यावेळी अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला.

परंतू  सरपंच हे जनतेने निवडून दिले आहेत.सन २०१७ चे शासन निर्णयानुसार सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव ग्रा.पं.सभेत मंजूर झाला तरी जनतेच्या विशेष ग्रामसभेत निर्णय घेतला जाईल. असे तहसिलदार बर्गे यांनी यावेळी जाहीर केले.

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार २६डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील मतदारांनी गुप्त मतदान करुन आपला निर्णय दिला. निवडणूक अधिकारी म्हणून मावळचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी काम पाहिले.

अविश्वास ठरावास संमतीचे बाजूने २६९ मतदारांनी मतदान केले तर अविश्वास ठरावास संमती नसल्याचे बाजूने ३३१मतदारांनी मतदान केले.व ६२मताधिक्याने अविश्वास ठराव फेटाळला गेला. ४१ मते बाद झाली.

सरपंच रंजना शेंडे विजयी घोषित केल्यानंतर कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढली. तळेगाव एम.आय.डी.सी.चे पोलीस निरिक्षक प्रदीप लोंढे व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.