Pune Corona Update: हुश्श्श! आता पुण्यातील रुग्णालयांत नाही एकही कोरोनाबाधित रुग्ण

एमपीसी न्यूज :  दोन वर्षापूर्वी पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर पहिल्यांदाच शहरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालयात एकही रुग्ण नसल्याचे समोर आले आहे . सध्या शहरात 98 सक्रिय रुग्ण असून ते गृह विलीगीकरणात आहेत. 

कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात सापडल्यानंतर त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. कोरोना लाटेच्या सुरुवातील नायडू रुग्णालय आणि येथील डॉक्टरांनी अनेकांचे जीव वाचवले.

शहरातील कोरोनाची संख्या अत्यंत कमी झाली आहे. सध्या शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.