Pune : विनायक निम्हण यांच्याशी अजून काहीही चर्चा नाही – रमेश बागवे

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणारे आमदार विनायक निम्हण यांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका घेत काँग्रेस पक्षातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला होता. काँग्रेसमधील दोन माजी शहराध्यक्ष तसेच इतर जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची बैठक घेतली. त्या बैठकीत हा ठराव मंजूर करून घेण्यात आला होता. मात्र, आता काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हे वृत्त फेटाळले असून विनायक निम्हण यांच्याशी अजून काहीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

शहर काँग्रेस, राजीव गांधी स्मारक समिती आणि गोपाळ तिवारी मित्र मंडळ यांच्या वतीने १२ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान राजीव गांधी जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष रमेश बागवे बोलत होते.

विनायक निम्हण वरिष्ठ स्तरावर कोणाला भेटले असतील तर त्याची मला कल्पना नाही. मात्र, जेव्हा आमच्याशी चर्चा होईल तेव्हा आमची भूमिका मांडू असे देखील रमेश बागवे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराज असलेले विनायक निम्हण यांच्या काँग्रेस प्रवेशाला आता संकटांना सामोरे जावे लागेल असेच दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.