Indrayani River :  इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई! वाचा सविस्तर वृत्त…

पुणे जिल्हाधिकारी यांचा आदेश

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीचे (Indrayani River) पाणी प्रदूषित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्त आळंदीत येणाऱ्या वारकरी, भाविक, नागरिकांनी पाणी प्राशन करून आचमन करू नये, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

संत ज्ञानेश्वर पालखीचे सोमवारी (दि.21जून) संध्याकाळी 04 वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. कोरोना संकट काहीसे सरल्यानंतर यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने वारकरी, दिंडी, भाविक मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद, पुणे जिल्हाधिकारी  आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत.

SSC/HSC Result 2022 : दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा जनसेवा विकास समितीकडून गौरव

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय योजना या अंतर्गत इंद्रायणी नदीचे (Indrayani River) दूषित झालेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे तसेच नदी पात्रात कपडे धुण्यास सुद्धा मनाई करण्यात आली असून आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून परिसरात याबाबत जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत

यंदाची पालखी आरोग्यदायी, सुरक्षितपणे व्हावी म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश जारी केले आहेत. दिलेल्या आदेशांनुसार, आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या (Indrayani River) दोन्ही तीरांवरील पाणी तिर्थ म्हणून पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे तसेच दुषित झालेले पाणी यात्रा कालावधीत दिंड्यानी व इतरांनी स्वयंपाकासाठी देखील न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आषाढी वारीसाठी भाविकांसाठी विविध ठिकाणी स्वच्छता गृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्नान गृहांची सोय केलेल्या ठिकाणी स्नान करण्याचे यात आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 131 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.

India – Bangladesh Relationship : बांगलादेशची ‘मँगो डिप्लोमसी’, पंतप्रधान हसीनांकडून राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी एक मेट्रिक टन ‘आम्रपाली’ आंब्याची भेट

दरम्यान, आळंदी नगरपालिका मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी उपलब्ध पाणीव्यवस्थेबद्दल सांगताना म्हणाले, टँकर मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपालिकेने खाजगी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. यामार्फत आळंदी येथे 15 पाण्याचे टँकर्स उपलब्ध करण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 5 पाण्याचे टँकर्स उपलब्ध होतील  तसेच पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 10 ते 12 पाण्याचे टँकर्स उपलब्ध होणार आहेत. या टँकर्स मार्फत नागरिकांना पाणी पुरवले जाईल तसेच नगरपालिका मार्फत पालखी सोहळा कालावधीत पुरेसा पाणीपुरवठा नळाद्वारे सुद्धा केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.