Lonavala News : लोणावळा-वडगाव दरम्यान शुक्रवारी अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री!

कार्ला फाटा ते पार्किंग व पायथा मंदिर दरम्यान नो व्हेईकल झोन घोषित

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा 8 एप्रिल रोजी (शुक्रवारी) कार्ला गडावर होणार आहे.

या पालखी मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची तसेच जुन्या महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने मावळचे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी मधुसूदन बर्गे यांनी 8 एप्रिल 2022 या दिवशी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कार्ला फाटा ते ग्रीन फिल्ड चौक, ग्रीन फिल्ड चौक ते गडावरील पार्किंग व पायथा रस्ता येथे नो व्हेईकल झोन तसेच मुंबई पुणे व पुणे मुंबई हायवे रोडवर कुसगाव बु. टोलनाका, लोणावळा ते वडगाव फाटा वडगाव मावळ दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री घोषित केली आहे.

हा बदल फक्त 8 एप्रिल रोजी एकाच दिवसासाठी असणार आहे. दोन वर्षानंतर देवीची यात्रा भरणार असल्याने राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना तासंतास वाहतूककोंडीत आडकून पडावे लागू नये याकरिता सदरचा बदल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.