Pune News : कोरोना सर्वेक्षणासाठी मनुष्यबळच नाही; भिस्त केवळ आरोग्य निरीक्षकांवर

0

एमपीसी न्यूज : शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णाांच्या संपर्कात येणार्‍यांची माहिती घेण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळच उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाचे सर्वेक्षण करण्याची भिस्त केवळ आरोग्य निरीक्षकांवर असून हे काम ‘राम भरोसे’ असल्याचे समोर आले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाकडून रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा सर्व्हे करून योग्य त्या उपाय योजना केल्या जातात. सर्वेक्षणादरम्यान कोणाला थंडी, ताप, खोकला, सर्दी अथवा काही कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास त्यांला क्वारंटाईन, विलगीकरण यासंदर्भात माहिती देऊन पुढील कार्यवाही केली जाते.

_MPC_DIR_MPU_II

सर्वेक्षणाच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने प्रथम क्षेत्रीय कार्यालयांचे आरोग्य निरीक्षक (एसआय), वरीष्ठ आरोग्य निरीक्षक (डीएसआय), आंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शिक्षक-शिक्षिका यांना कामाला लावण्यात आले होते. त्यानंतर पीएमपीएमएलच्या कर्मचार्‍यांची मदत घेण्यात आली. या सर्वेक्षणातून कोरोनाच्या अनेक रुग्णांचे निदान झाले.

मात्र, शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सर्वेक्षणासाठी नेमलेले कर्मचारी आपल्या मूळ ठिकाणी रुजू झाल्याने हे काम थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देणारे पत्र शासनाने महापालिकेला काही महिन्यांपूर्वी पाठवले होते. मात्र या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शासनाचे पत्र आल्यानंतर आरोग्य विभागाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली होती, मात्र उपलब्ध मनुष्यबळात काम करून घेण्याच्या सूचना देण्यात आला.

आता शहरातील कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून एका रुग्णामागे 15, 17 ते 20 लोकांचे सर्वेक्षण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मागणी करूनही मनुष्यबळ मिळाले नाही. परिणामी सर्वेक्षणाचे काम सुरूच झाले नसल्याचे आणि हे काम मागील काही महिन्यांपासून बंदच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जे काय सर्वेक्षण केले जाते, ते क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक आणि वरीष्ठ आरोग्य निरीक्षक आपली दैनंदिन कामे करून राहिलेल्या वेळात करतात. त्यामुळे हे काम राम भरोसे सुरू असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसापूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सर्वेक्षणासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयाला दिल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.