Pimpri News : गोवरचा उद्रेक नाही, चिंतेचेही कारण नाही; पण, खबरदारी घ्यावी – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – कुदळवाडी परिसरातील गोवरची लागण झालेल्या 3 मुली आणि 2 मुलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.(Pimpri News) शहरात गोवरचे रुग्ण सापडले असले. तरी, गोवरचा उद्रेक नाही. चिंतेचे कारण नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले. तसेच गोवर बाधितांसाठी 30 बेडची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चिखली – कुदळवाडी येथील 5 बालकांना गोवरची लागण झाल्याचे मंगळवारी (दि.29) निष्पन्न झाले. त्यापार्श्वभूमीवर महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त सिंह यांनी आज (बुधवारी) पत्रकारांना दिली. आयुक्त सिंह म्हणाले, कुदळवाडी परिसर गोवरचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे कुदळवाडी भागातील 9 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना गोवरचा बुस्टर डोस दिला जात आहे. आजपर्यंत 320 बालकांना बुस्टर डोस देण्यात आला. लशीचा तुटवडा नाही. ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 1 डिसेंबरपासून रस्ता ‘सुरक्षा’ उपक्रम

गोवरची लागण झालेल्या 5 बालकांची प्रकृती स्थिर आहे. कोणी गंभीर नाही. गोवरची लागण झाल्यानंतर रस, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. लसीकरण करुन घेतल्यास कोणताही धोका नाही. बालवाडी, शाळांनाही खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.(Pimpri News) गोवरची लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगण्यात आले आहे. नवीन आकुर्डी रुग्णालयात 10, जिजामाता 10, थेरगाव 5 , भोसरी रुग्णालयात 5 आणि वायसीएम रुग्णालयात 8 आयसीयू बेड गोवर बाधितांसाठी राखीव ठेवले आहेत. कुदळवाडीशिवाय दुस-या कोणत्याही भागात गोवरचे रुग्ण नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये पण खबरदारी घ्यावे असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.

98 हजार 743 घरांचे सर्व्हेक्षण

आतापर्यंत 98 हजार 743 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर, 3 लाख 69 हजार 336 नागरिकांचे सर्व्हेक्षण केले. 5 वर्षाखालील सर्व्हेक्षण 21 हजार 200  बालकांचे  सर्वेक्षण करण्यात आले. तर, 10 हजार 822 बालकांना व्हिटॅमीन ए ची मात्रा देण्यात आली आहे.  (Pimpri News) शिवाय शहरातील 1 हजार 893 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पथकानेही पाहणी केली. जास्तीत-जास्त बालकांना लस देण्यासाठी पालकांना आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या बालकांना गोवरची लस द्यावी असेही डॉ. साळवे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.