Bhosari : ’72 वर्षात महेशदादांसारखा आमदार झाला नाही’

मोशीतील ज्येष्ठ नागरिक बबनराव बो-हाटे यांची भावना; लाखाने नव्हे सव्वालाखाच्या फरकाने दादा पुन्हा आमदार होणार 

एमपीसी न्यूज – भोसरी मतदारसंघातील नागरिकाला कुटुंबाप्रमाणे जपणारा, सर्वांच्या सुख-दुख:त सहभागी होणारे आमदार महेश लांडगे आहेत. चूक असेल तर समजून सांगणारे आमदार आहेत.  त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले असून 72 वर्षात महेशदादांसारखा आमदार झाला नाही, अशी भावना मोशीतील ज्येष्ठ नागरिक बबनराव बो-हाटे यांनी व्यक्त केली.  तसेच मोशीतील नागेश्वर मंदिरासमोरील जागेचा प्रश्न देखील महेशदादांनी निकालात काढला आहे. दादा लाखाच्या नव्हे तर सव्वा लाख मताच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

मोशी, जाधववाडी, डुडूळगावकरांचा मोशीत मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना बबनराव बो-हाटे यांनी आमदार महेश लांडगे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. बो-हाटे म्हणाले, आमदार महेश लांडगे यांनी विकास कामे तर केलीच आहेत. समाविष्ट गावाचा कायापालट दादांमुळेच होत आहेत. प्रशस्ते रस्ते झाले आहेत. उद्यान, शाळा होत आहेत.  गायरानाची जागा ताब्यात घेऊन विकास कामे केली जात आहेत.

विकास कामे होतच राहतील. परंतु, सर्वांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक आमदार महेशदादा देतात. कोणत्याही कार्यक्रमात हजर असतात. कोणतेही काम करतात. चुका समजून सांगतात. सुख दुख:त सहभागी होऊन आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. माणूसकी जपणारा आमदार आहे, अशी भावना बो-हाटे यांनी व्यक्त केली. दादा लाखाने नव्हे तर सव्वा लाख मताच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोशीतील नागेश्वर मंदिरासमोर भंडारा असल्यावर नागरिकांना बसायला जागा नव्हती. जागेसाठी आम्ही गावकरी अनेक वर्षांपासून झगडत होतो. त्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, जागा मिळत नव्हती. बांधकाम व्यावसायिक आम्हाला दाद देत नव्हते. आमदार महेश लांडगे यांनी जागा मिळवून दिली आहे. त्यांच्यामुळेच जागा मिळाली आहे. मंदिरासमोर प्रशस्त जागा झाली आहे. त्यामुळे नागेश्वर महाराजांची त्यांच्यावर कृपा आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.