Pimpri: कोणाला काय वाटते, याची फिकीर करण्याची गरज नाही, अजितदादांनी विरोधकांना सुनावले

No need to listen to what others say, Deputy CM Ajit Pawar on Opposition leaders.

एमपीसी न्यूज – कोरोनामध्ये राजकारण आणण्याचे कारण नाही. कोणाला काय वाटते. याची आज फिकीर करण्याची गरज नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली. दरम्यान, या संकटातून जनता बाहेर कशी पडेल. सुरक्षित कशी राहील. याला आमचा अग्रक्रम असून ते काम मनापासून चालू आहे, असेही ते म्हणाले.

पिंपळेसौदागर येथे आज (शुक्रवारी) पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष आहे का, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, केंद्राने असे केले, राज्याने तसे केले. महापालिकेने असे केले, जिल्हा परिषदेने तसे केले. एकमेकांच्यावर ढकलाढकली करण्यापेक्षा कोरोनाचे जगावर आलेले संकट आहे. जगाने या संकटाचा मुकाबला करायचे ठरविले आहे. त्यावेळेस आपला भारत आणि भारतातील सगळी जनता एकसंघ होऊन संकटाशी सामना करत आहे. अशा प्रकारचे चित्र समाजामध्ये जाण्याची गरज आहे.

त्यासाठी आम्ही आमच्या परीने परराज्यातील मजूरांसाठी जेवढ्या काही ट्रेन मागवून घेता येतील. तेवढ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्याचे काम सुरु आहे. कोणीही कोणाच्याही गावाला जात असताना चालत जाण्याचा प्रयत्न करु नये. त्यासाठी एसटी बसही उपलब्ध करुन दिली आहे. रेल्वे देखील उपलब्ध करुन घेतली आहे. सर्वांनी नियमाचे काटेकोर पालन करावे. बंधने पाळावीत. मास्क वापरावा, सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.