-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : पुणे महापालिकेत नगरसचिव पदासाठी एकही अधिकारी पात्र नाही !

आयुक्त विक्रम कुमार यांनी केली निवडीची प्रक्रीया रद्द

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या नगरसचिव पदासाठी एकही अधिकारी पात्र नसल्याचे कारण देत आयुक्त विक्रम कुमार यांनी या पदाची निवडीची प्रक्रीया रद्द केली आहे. या पदासाठी २९ अधिकारी इच्छुक हाेते.महापािलकेची मुख्य सभा, इतर विषय समितींच्या कामकाजासाठी नगरसचिव कार्यालयाची महत्वाची भूमिका असते.

नगर सचिव हे या कार्यालयाचे प्रमुख असतात, गेल्यावर्षी  अाॅगस्ट महीन्यात तत्कालीन नगरसचिव सुनील पारखी हे निवृत्त झाले. या पदाची हंगामी जबाबदारी शिवाजी दाैंडकर यांच्याकडे साेपविण्यात अली आहे. तेव्हापासून दाैंडकर हे या पदावर काम पाहत आहेत. महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी जानेवारी महीन्यात हे पद भरण्यासाठी प्रक्रीया सुरू केली.

या पदाच्या पात्रतेच्या निकषाच्या आधारावर निवड केली जाणार हाेती. या पात्रतेमध्ये विधी शाखेची पदवी हा महत्वाचा निकष आहे. महापािलकेतील सुमारे २९ अधिकारी या पदासाठी इच्छुक हाेते. यामध्ये दाैंडकर, उपायुक्त रमेश शेलार, संताेष पवार , वैभव कडलघ आदी अधिकाऱ्यांचा समावेश हाेता.

सदर निवड प्रक्रीया गेल्या पाच महीन्यापासून सुरू हाेती. शैक्षिणक पात्रता असलेल्या उमेदवारांच्या शंभर गुणांची मुलाखत ही घेण्यात आली हाेती. यामुळे महापािलकेला पुर्णवेळ नगरसचिव मिळण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. परंतु, मुलाखत झालेल्यांपैकी एकाही उमेदवाराची या पदासाठी पात्रता नसल्याने  महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही निवडणुक प्रक्रीया रद्द केली गेली आहे.  यामुळे या पदाच्या निवडीवरून पुढील काळात वाद निर्माण हाेऊ शकतात.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.