Dehuroad : पोलीस बंदोबस्ताच्या अभावी देहूरोड बाजारपेठेत गणेश भक्तांमध्ये संताप

एमपीसी न्यूज- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान देहूरोड बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त नसल्याच्या कारणास्तव आज, येथील मंडळांनी पोलिसांचा निषेध करीत गणपती न हलविण्याची भूमिका घेतली. यामुळे काहीकाळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज सकाळपासून निरोप देत आहेत. गेल्या १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी (23 सप्टेंबर) नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत आहेत.

गणेशोत्सवापासून पोलीस बंदोबस्ताची परीक्षा असते. मात्र, देहूरोड बाजारपेठेत पोलिसांनी पाठ फिरवल्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रभावित झाली आहे. पोलिसांची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली आहे. त्यामुळे भाविकांनी आक्रमक पवित्रा घेऊन पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करण्यास सुरुवात करून गणपती न हलविण्याची भूमिका येथील मंडळांनी घेतली. शिव स्मारक समिती ट्रस्ट, महात्मा फुले मंडई, नवशक्ती चैतन्य, अजिंक्य, एकता बाॅईज, सुदर्शन, मैत्री या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून पोलिसांचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.