Hinjawadi Crime News : 68.49 लाख रुपये घेऊन देखील फ्लॅटचा ताबा नाही, सहा जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – 68.49 लाख रूपये घेऊन देखील फ्लॅटचा ताबा किंवा नोंदणी न केल्यामुळे सहा जणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2018, 2019 आणि 2020 या कालावधीत प्रिस्टिन होरिझोन कं ऑफिस, हिंजवडी, ता. मुळशी येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी योगिता विमल दास (वय 38, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी शुक्रवारी (दि.08) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिक ओमप्रकाश अगरवाल, मोना अगरवाल व त्याचा भाऊ, शुभम अगरवाल व कंपनीचे मॅनेजर आणि किरण कुंभारकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व इतर लोकांकडून 68 लाख 49 हजार रूपये घेतले पण, अद्याप फ्लॅटचा ताबा अथवा कोणत्याही प्रकारचे शासकिय नोंदणी केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.