Pune : ईव्हीएमला नाही सील! कॅन्टोन्मेंटमध्ये गोंधळ; पोलिसांना पाचारण

एमपीसी न्यूज – सर्वात जास्त उमेदवार रिंगणात असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम सीलबंद नसल्याने सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळासाठी मतमोजणी थांबवण्यात आली आहे. पाहिल्याफेरीत भाजपचे सुनील कांबळे आघाडीवर आहेत.

पुण्यातील मतमोजणीला सकाळीच सुरुवात झाली. कॅन्टोन्मेंट मतदार संघाची पहिली फेरी पार पडल्यानंतर दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीला 14 क्रमांकाच्या टेबलवरील ईव्हीएम सीलबंद नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने काँग्रेस आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची आधी मोजणी करावी आणि नंतरच ईव्हीएमला हात लावावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

ईव्हीएम सीलबंद करायची राहिली असेल असे कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. परंतु कार्यकर्त्यांनी लेखी उत्तर मिळाल्याशिवाय मतमोजणी न करण्याची मागणी केली. त्यामुळे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची मतमोजणी थांबवण्यात आली आहे. दरम्यान, मतमोजणी ठिकाणचा गोंधळ पाहता पोलिसांना पाचारण करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.