Pune : पुणे शहराला पूर्वी प्रमाणे पाणी मिळणार, पाणी कपात नाही : पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता. शहरातील नागरिकांना पूर्वी प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाणी कपात केली जाणार नाही. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. तर भविष्याचा विचार करिता नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे. असे आवाहन देखील त्यांनी केले. 
जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागील महिन्यात झाला. त्यामुळे पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार हे निश्चित मानले जात होते. मात्र त्या पूर्वीच नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यात आधिकची कपातीची भर पडणार, म्हणून महापालिकेतील विरोधी पक्षाकडून महिनाभरात अनेक वेळा आंदोलन करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले आदी उपस्थित होते.
तर या बैठकीत पाणी कपात केली जाणार नसून पूर्वी प्रमाणे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पुणेकर नागरिकांवरील पाणी संकट टळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.