BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पुणे शहराचा पाणीपुरवठा 17 जानेवारीला बंद राहणार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पार्वती जलकेंद्र पंपिंग, वॉटर पंपींग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एस. एन. डी. टी./वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपींग येथील विद्युत/पम्पिंग विषयक आणि स्थापत्य विषयक तसेच पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा 17 जानेवारी गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

यावेळी अत्यावश्यक देखभालीचीही कामे केली जाणार आहेत,अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिली आहे. तर दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१८) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.

सध्या पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही पुणे शहराला पाणीपुरवठा कमी पडत असल्याचे सांगाळण्यात येते. यातच जलकेंद्रेही वेळोवेळी दुरुस्त तसेच त्याची देखभाल करणे आवश्यक आहे

HB_POST_END_FTR-A2

.