Pune News : वारजे, पाषाण, बाणेरसह ‘या’ भागातील पाणीपुरवठा गुरूवारी राहणार बंद

एमपीसी न्यूज – वारजे जलकेंद्र, खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझिंग मेन लाईनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विषयक काम केले जाणार आहे. याकाळात वारजे जलकेंद्र येथील पंपिग बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे वारजे, पाषाण, बाणेरसह अनेक भागातील पाणीपुरवठा गुरूवारी (दि.27) बंद राहणार आहे.

दुरूस्तीच्या कामामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र व नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा गुरूवारी (दि.27) बंद राहणार आहे तसेच, शुक्रवारी (दि.28) उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग (वारजे जलकेंद्र)

भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकातनाका परिसर इ. व नवीन होळकर जलकेंद्राकडील कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, मुळा रोड, संगमवाडी, पाटील इस्टेट, भांडारकर रोड इत्यादी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.