DID Li’l Masters Winner : नोबोजित नरझरी ठरला ‘डीआयडी लिटल मास्टर 5’चा मानकरी

एमपीसी न्यूज – ‘डान्स रियालिटी शो डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5’ (DID Li’l Masters Winner) चा किताब नोबोजित नरझरी याने पटकावला आहे. 8 वर्षीय नोबोजितने सगळ्या स्पर्धकांमध्ये अव्वल परफाॅर्मन्स सादर करत हा बहुमान मिळवला आहे. यावेळी नोबोजितला डीआयडी ट्राॅफीसह बक्षीस म्हणून 5 लाख रुपये देण्यात आले आहेत. डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 च्या ग्रँड फिनालेसाठी स्पर्धकांना प्रोस्ताहन देण्यासाठी ‘जुग जुग जिओ’च्या स्टार कास्टची प्रमुख उपस्थिती होती.

‘डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5’ (DID Li’l Masters Winner) च्या ग्रँड फिनालेमध्ये एकापेक्षा एक अप्रतिम डान्स परफॉर्मन्स सादर करण्यात आले. यावेळी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी, प्राजकता कोळी, अनिल कपूर, मनीष पॉल आदी ‘जुग जुग जिओ’ची स्टार कास्ट उपस्थित होती. या शोमध्ये रेमो डिसूजा, सोनाली बेंद्रे आणि मौनी रॉय जज होते.

दरम्यान, नोबोजित नरझरी याने सगळ्यांमध्ये सर्वोत्तम परफाॅर्मन्स सादर करत डान्स रियालिटी शो डीआयडी लिल मास्टर्स सीझन 5 चा किताब पटकावला. यावेळी नोबोजित भावूक झाला.

Eknath Shinde Update : ‘मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर…’ एकनाथ शिंदे भूमिकेवर ठाम; शिवसेनेला टोला

किताब पटकावल्यानंतर नोबोजित भारावून म्हणाला विजयाचे श्रेय तो त्याची गुरू दीपिकाला देतो. तो म्हणाला की, त्याला प्राइड मनीमधून त्याच्या दीपिका मॅमसाठी एक मोठा डान्स क्लास उघडायचा आहे. कारण आज जर तो जिंकू शकला, तर त्याचं सर्व श्रेय दीपिका मॅमला जातं.

नोबोजित पुढे म्हणाला, डीआयडीमुळे त्याच्या संपूर्ण शाळेतील लोक त्याला ओळखू लागले आहेत. इतकंच नाही तर त्या लोकांना माझ्याशी बोलायचं आणि भेटायचं आहे. मी खूप आनंदी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.