BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दुपारचे 4 वाजले तरी चिखल काही हाटेना, राज ठाकरे यांची सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा

एमपीसी न्यूज – दुपारचे 4 वाजले तरी सरस्वती विद्या मंदिराचा मैदानावरील चिखल काही काही हाटेना, कामगार, मनसे सैनिक जीव लावून हा चिखल बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. तो काही कमी होत नाही. आज सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची या मैदानावर सभा होणार आहे.

मनसेने सभेसाठी अलका टॉकीज चौकातील जागा सभेसाठी मागितली होती. पण, ही जागा देण्यात आली नाही. शाळांच्या जागाही भाजपच्या मंडळींच्या असल्याने मनसेला प्रचारासाठी जागा मिळू नये, असा भाजपचा प्रयत्न असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मनसे आज पुण्यातून फोडणार आहे. हे मैदान अतिशय कमी आकाराचे आहे, मनसे सैनिकांची, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. मनसेला चांगली जागा न मिळू दिल्याने राज ठाकरे भाजपवर हल्लाबोल करणार असल्याची चर्चा आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3