Nostalgia: पाहा बरं सखीला काय सापडले, काय निसटले ते…

Nostalgia: See what Sakhi Gokhale found, what escaped ‘काही हात सापडले, काही निसटले’असे म्हणत एक जुनी आठवण सखीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सखीने तिचा शाळेत जातानाच एक फोटो पोस्ट केला आहे.

एमपीसी न्यूज- हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार किड्सची चर्चा तर नेहमीच होते. पण मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार किड्स लो प्रोफाइल असतात. मराठीतील अशीच एक स्टार किड जी आता मोठी झाली असून काहीतरी वेगळे करुन स्वत:ला सिद्ध करत आहे. सखी मोहन गोखले हे तिचे नाव. दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी ही एकुलती एक लेक.

आई आणि वडिलांचा अभिनयाचा वारसा सखीकडे आला. शिवाय ती स्वत:चे असे वेगळे काही तरी करतच असते. सध्या ती तिचा नवरा सुव्रतसोबत इंग्लंडमध्ये चित्रपटविषयक अभ्यास करण्यासाठी राहते आहे. तिथून ते दोघे एक टिव्ही मालिका देखील करत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

‘काही हात सापडले, काही निसटले’असे म्हणत एक जुनी आठवण सखीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सखीने तिचा शाळेत जातानाच एक फोटो पोस्ट केला आहे.

या फोटोत तिच्यासोबत आई शुभांगी व वडील मोहन गोखलेसुद्धा पाहायला मिळत आहेत. त्या जुन्या आठवणींना उजाळा देत सखीने भावुक पोस्ट लिहिली आहे.


‘ही जागा… माझ्या शाळेची बस मला या ठिकाणाहून न्यायला आणि सोडायला यायची. मला निरोप देणारे आणि हसऱ्या चेहऱ्याने माझी वाट पाहणारे हात मी या ठिकाणी धरले.

काही हात कोमल होते, तर काही कणखर, काही हातांना हाती घेताना माझे छोटे हात त्यात दिसेनासे व्हायचे, काहींच्या मिठीत मी असायचे. काही हात निसटले, तर काही सापडले’, अशी भावनिक पोस्ट सखीने लिहिली.

आपल्या चिमुकल्या मुलीला शाळेत सोडताना आईवडिलांची जी गडबड, धडपड सुरु असते, तीच या फोटोत पाहायला मिळतेय. अभिनेत्री कितीही प्रसिद्ध असली तरी ती आई असते तेव्हा वेगळीच असते हे जणूकाही सखीला यातून समजावायचे आहे.

मोहन आणि शुभांगी गोखले हे स्टार दांपत्य चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून खूप वेगळे होते. मोहन यांच्या अकाली निधनानंतर शुभांगी यांनी सखीला खूप डोळसपणे वाढवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1