Not in schedule : नाॅट इन शेड्युल्डची पुनर्रचना होणार; महापालिका कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश

एमपीसी न्यूज – महापालिकेतील कर्मचारी अधिकारी (Not in schedule) यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेतील (सी.एच.एस.) नाॅट इन शेड्युल्ड असलेल्या (उपचाराच्या बीलांची परिपुर्ती न होणा-या आजारांची तसेच उपचार पध्दतीची ) परिपत्रकाची पुनर्रचना केली जाणार आहे तसेच पूर्वीप्रमाणेच अधिकाधिक उपचार पध्दतीचा लाभ महापालिका कर्मचा-यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली.

सी.एच.एस.मधील कपातीमुळे महापालिकेतील बहुतांशी कर्मचारी आरोग्य विभागावर नाराज होते. तर आज गुरूवारी सकाळीच आरोग्य विभागाच्या या निर्णयाविराेधात दंड थोपटले होते. परंतु, अवघ्या काही तासातच या लढ्याला यश आले. आरोग्य विभागाने महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या सर्व रूग्णालयांना महापालिकेने गुरूवारी तात्काळ पत्र पाठवून नाॅट इन शेड्युल्ड असलेल्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

तसेच नाॅट इन शेड्युल्ड (Not in schedule) असलेल्या सर्व वैद्यकीय प्रक्रिया व तपासण्या यांना ग्राह्य धराव्यात. या सर्व प्रक्रिया व तपासण्याची देयके दोन महिन्यांपूर्वी असलेल्या प्रचलित अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या निकषाप्रमाणेच महापालिकेच्यावतीने अदा करण्यात येतील असेही कळविले आहे.

1995 पासून सुरू झालेल्या सी.एच.एस. म्हणजेच वैद्यकीय सहाय्य योजनेतील उपचार पध्दती व बीलांच्या प्रतिपूर्तीची फेररचना 2000 साली करण्यात आली होती. त्यांनतर गेल्या 22 वर्षात या योजनेत काळानुरूप बदल करण्यात आले नाहीत. परंतु, वैद्यकीय उपचार पध्दतीत अमुलाग्र बदल झाले. अनेक तपासण्या या रोबोटीक पध्दतीने आल्या.

Pune News : माहिती व तंत्रज्ञान विषयक कामकाजासाठी प्रत्येक विभागात नेमणार ‘नोडल ऑफीसर’ 

शस्त्रक्रियाही लेझरव्दारे होत आहेत. अशावेळी जुन्याच पद्धतीने (Not in schedule) होणारी वैद्यकीय सहाय्य योजनेतील बीलांची प्रतिपूर्ती कर्मचा-यांना अन्यायकारक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नव्या उपचार पध्दतींचा व शस्त्रक्रियांचा सी.एच.एस.मध्ये अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता कोणत्या उपचार पध्दती व शस्त्रक्रियांची मागणी जास्त आहे, याचा अभ्यास करून त्यांचा अंतर्भाव योजनेत करतानाच वाढीव आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.

येत्या 25 मे पर्यंत हा अहवाल तयार करून तो आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.