Talegaon Dabhade : मोठया थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा

कारवाईच्या भीतीने मिळकतकर भरण्यासाठी मिळकतदारांची गर्दी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने तळेगाव शहरातील मोठी थकबाकी असलेल्या मिळकतदारांना मालमत्ता जप्त करण्याच्या नोटीसा बजावल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर कठोर कारवाई होणार असल्याने कर भरणा करण्यासाठी मिळकतदारांची गर्दी होत आहे.

तळेगाव शहरात एकून 35 हजार मिळकतदार आहेत.या सर्व मिळकतदारांकडे एकूण सर्व प्रकारची 29 कोटी 38 लाख 63 हजार 970 रुपये हि वसुली येणे होती. मागील अकरा महिन्यात यापैकी अवघी 8 कोटी 39 लाख 27 हजार 197 रुपये वसुली झाली आहे. तर सुमारे 21 कोटी, 39 लाख 55 हजार एवढी थकबाकी येणे आहे. असे कर निरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले.

कर संकलन विभागाला एवढी मोठी थकबाकी वसुलीसाठी कमी कालावधी बाकी राहिला असल्याने कठोर उपाय योजना करण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे. यामध्ये नागरिकांना टॅक्स भरण्याचे आवाहन करण्यासाठी गाडी व्दारे आलाउन्स करणे, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी फ्लेक्सव्दारे कर भरण्याचे आवाहन करणे, जप्तीच्या नोटीसा पाठविणे, वृत्तापत्राव्दारे थकबाकीदारांची नावे जाहीर करणे आदि उपाय करण्यात येत आहे.

 नगर परिषदेकडून मिळकतदारांना वसुली बाबतच्या नोटीसा वेळेवर पाठविण्यात न आल्यामुळे मोठी थकबाकी वसुलीची नामुष्की करसंकलन विभागावर आली आहे. तसेच काही मिळकतदारांना अद्यापही कर वसुलीचे मागणी नोटीस मिळाली नसल्याचे मिळकतदार तक्रार करत आहेत.

करवसुली मध्ये शहरातील मोबाईल टावर,कोरोनामुळे थकलेली थकबाकी,कोर्टातील थकबाकीच्या केसेस, शासकीय कार्यालयाच्या इमारती वरील अनेक वर्षाची थकबाकी अश्या बाबी करवसुली मध्ये समाविष्ट आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.