pune : कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खाटा नाकारणाऱ्या 25 हून अधिक खासगी रुग्णालयांना नोटिसा : रुबल अग्रवाल

Notice to more than 25 private hospitals for refusing beds for treatment of coronary heart disease: Rubel Agarwal

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी काही हॉस्पिटल दाद देत नाही. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी खाटा नाकारणाऱ्या तसेच लपविणाऱ्या 25  हून अधिक खासगी रुग्णालयांना महापालिकेने नोटीस बजावली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

रुग्णांना जास्त बिल आकारणे तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे बिल न आकारणाऱ्या रुग्णालयांनाही महापालिकेतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. कोरोनाबाधिताकडून जास्त बिल आकारल्याने जहांगीर हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे.

काही हॉस्पिटल हलगर्जीपणा करीत असल्याने रुग्णांना त्रास होत आहे. ज्युपिटर हॉस्पिटललाही नोटीस बजावण्यात आली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर संबंधित रुग्णांवर तिथेच उपचार करणे गरजेचे होते. रुग्णाला शिफ्ट करायला नको होते. त्यामध्ये नातेवाईकांची तक्रार आली. अशा दोन मुख्य मोठ्या हॉस्पिटलवर महापालिकेने कारवाई केली.

त्याचप्रमाणे डॅशबोर्ड अपडेट न करणाऱ्या आणखी 25 हॉस्पिटलांवर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना दोन दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे.

खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही रुबल अग्रवाल यांनी दिला.

आतापर्यंत ‘एफआयआर’ दाखल करण्याचे अधिकार ‘एचओडी’ स्तरावर होते. ते आता क्षेत्रीय स्तरावर देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.