Pimpri news: ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री प्रकरणी तीन रुग्णालयांना नोटीस

एमपीसी न्यूज – इतर हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलकडूनच ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने शहरातील तीन नामांकित  हॉस्पिटलच्या व्यवस्थापनांना आयुक्त राजेश पाटील यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. 48 तासांच्या आत यासंदर्भात खुलासा मागविला आहे.

सध्याच्या परिस्थितीत ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची मोठी आवश्यकता भासत आहे. त्याचा तुटवडा जाणवत आहे. चढ्या दराने इंजेक्शनची विक्री केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

याची सखोल चौकशी करून पुढील 48 तासात अहवाल द्यावा. तसेच साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आपण विरुद्ध आवश्यक कारवाई का, करू नये असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.