Dehuroad : लॉकडाऊनमध्ये चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Notorious criminal who did many robberies during lockdown was arrested by Crime Branch at Dehuroad.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत देहूरोड परिसरात जबरी चोरी करून भूमिगत झालेल्या अट्टल गुन्हेगाराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तो एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असून त्याच्यावर 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

शेऱ्या उर्फ ऋषीकेश राजु अडागळे (वय 21, रा. पदमावती मंदिरासमोर, मौजे उर्से, ता. मावळ, जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी गणेश मालुसरे यांना माहिती मिळाली की, कुख्यात गुन्हेगार शेऱ्या उर्फ ऋषीकेश राजु अडागळे हा सेंट्रल चौक, देहूरोड येथे येणार आहे. तो देहूरोड परिसरात गुन्हे करण्याच्या तयारीत आहे.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देहूरोड येथील सेंट्रल चौकात सापळा लावला. काही वेळाने शेऱ्या सेंट्रल चौकात आला. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले.

पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मागील काही दिवसांपूर्वी देहूरोड परिसरात एक जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले. आरोपी शेऱ्यावर देहुरोड पोलीस ठाण्यात 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तो देहूरोड पोलीस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. त्यामुळे त्याला पुढील कारवाईसाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजाराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस कर्मचारी गणेश मालुसरे, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे, नितिन बहिरट यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.