Novak Tested Positive : प्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह 

Famous tennis player Novak Djokovic and his wife Corona Positive

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध टेनिसपटू  नोव्हाक जोकोविच आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नोव्हाकने स्वतः याबाबत  माहिती दिली आहे.

ANI या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हाक जोकोविचने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

या मध्ये असे म्हंटले आहे की, आम्ही जेव्हा बेलग्रेडला पोहचलो तेव्हा आमची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत  माझी  आणि माझी पत्नी जेलेना हिची चाचणी  कोरोना पॉझिटिव्ह  आली.

मात्र, आमच्या मुलांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आम्ही 14 दिवस सेल्प क्वारंटाईन राहणार आहोत,  अशी माहिती नोव्हाक जोकोविच  याने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like