Pune : आता खासदार संजय काकडे यांच्या भूमिकेकडे लक्ष!

एमपीसी न्यूज – काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाशिव आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 2017 मध्ये पुणे महापालिकेत भाजपचे 98 नगरसेवक आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमधून भाजपचा 1 नगरसेवक वाढला. आता ही संख्या 99 झाली आहे.

महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता असली तरी आमची महाशिव आघाडी तुमच्यावर अंकुश ठेवणार असल्याचा इशारा यापूर्वीच विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी दिला आहे. सत्तेच्या काळात शिवसेनेला सन्मानजनक वागणूक दिली नाही. त्यामुळे शिवसेना भाजपच्या कारभारावर लक्ष ठेवून राहणार आहे.

संजय काकडे यांना मानणारे पुणे महापालिकेत सुमारे 30 नगरसेवक आहेत. त्यांना आजपर्यंत भाजपने कोणतेही महत्वाचे पद दिले नाही. त्यामुळे या नागरसेवकांत असंतोष खदखदतोय. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दनकावून पराभव झाला. तर, खडकवासला मतदारसंघात भिमराव तापकीर यांचा केवळ 2600 मतांनी विजय झाला. मोदी लाट ओसरत असल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी सुवर्णसंधी आहे. 2022 च्या महापालिका निवडणुकीची इच्छुकांनी आता तयारी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.