Internet Pornography : इंटरनेटवर अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांवर आता पोलिसांची नजर

एमपीसी न्यूज : इंटरनेटवर अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांवर उत्तर प्रदेश पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. उत्तर प्रदेशातील महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता पोलिसांनी गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे.

जो कुणी अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या वेबसाईटवर व्हिडीओ पाहायला जाईल त्यानंतर पोलिसांच्या 1090 या वेबसाईटवर एक मेसेज जाईल व त्यानंतर त्या व्यक्तीचा सर्व डेटा पोलिसांकडे जमा होणार आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने पुढे जाऊन काही गुन्हा केला तर पोलीस त्या व्यक्तीला त्या डेटा आधारे पकडू शकतील.

उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबात जनजागृती करण्यासाठी एक मोहिम हाती घेतली आहे. ‘.’छिछोरों के न चलेंगे हथकंडे जब 1090 चलाएगी उन पर डंडे’ जैसे मैसेज जाएंगे. इसके अलावा, ‘गुंडे बदमाशों से पीछा छुड़ाना है तो 1090 पर कॉल लगना है’, , विपत्ति में सहारा है, 1090 हमारा है’, डरने की क्या बात ’10 90 है तुम्हारे साथ’ असे टॅगलाईन पोलिसांनी सोशल मीडियावरून शेअर करत याबाबत जागृती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.