Pimpri : मानव निर्मित वस्तू उत्पादन लवकरच रोबोटच्या स्वरुपात – डॉ. दीपक शिकारपूर

एमपीसी न्यूज – विविध उद्योग समुहात आज होणारे मानव निर्मित वस्तू उत्पादन लवकरच रोबोटच्या वतीने करण्यात येतील असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी मत  व्यक्त केले.

भोसरी येथे क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने 33 वे चॅप्टर कन्व्हेन्शन संपन्न झाले. त्याचे उद्घाटन प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी दिवंगत अनंतराव पाटील, सामाजिक पुरस्कार पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर यांना डॉ. शिकारपूर व स्वातंत्र्य सेनानी दिवंगत पाटील यांचे नातू पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व मानपत्र स्वरुपात प्रदान करण्यात आले. यावेळी फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पदाधिकारी माधव बोरवणकर, क्षितीजचंद्रा भारती, डॉ. अजय फुलंबरकर, संजय शिंदे उपस्थित होते.

दिवसभरात दोन सत्रात झालेल्या उद्योग समुहाच्या प्रबंध सादरीकरणाच्या स्पर्धेत बेस्ट ऑफ बेस्ट सुवर्णपदकाचा बहुमान तळेगाव येथील जेसीबी उद्योगसमुहाला मिळाला. तसेच 100 सुवर्ण, 60 रजत व 40 रौप्य पदके विजेत्या संघांना एक्साईड कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक के. अनिरुद्ध व जनरल मोटर्स कंपनीचे प्लॉन्ट क्वालिटी व्यवस्थापक विनय पाटील यांच्या हस्ते जल्लोषात भव्य स्मृतिचिन्ह व प्रशस्तीप्रत्र स्वरुपात प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील तसेच कर्नाटक येथील मोठया संख्येने उद्योग समुहातील 180 संघातून स्पर्धेत सुमारे 800 स्पर्धकांनी विविध गटानुसार, विषयानुसार प्रबंध सादर केले.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. शिकारपूर म्हणाले, येणार्‍या काळात रोबोटचा वापर विविध उद्योग समुहात वस्तुनिर्मिती कामासाठी वापरले जाऊ लागतील. त्यामुळे जागतिक पातळीवर बदलत्या तंत्रज्ञान क्षेत्रात नुसते संगणक येऊन चालणार नाही तर स्वयंचलित तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. एकाच व्यक्तीला उत्पादन प्रक्रियेपासून वस्तू विक्रीची बाजारपेठेची अत्यावश्यक सर्वंकष माहिती असावी लागणार आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी विषयी त्यांनी जागरुक असणे ही काळाचीच गरज निर्माण झाली आहे.

दुसर्‍या सत्रात पारितोषिक वितरण समारंभात एक्साईड कंपनीचे के. अनिरुध्द म्हणाले, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या गुणवत्ता मंडळामुळे विविध उद्योग समुहातील घटकांच्या कल्पकतेला स्पर्धामधून वाव दिला जातो ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे या संस्थेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. स्पर्धामधून उद्योग समुहातील सुरक्षा, वस्तू निर्मितीची गुणवत्ता व उत्पादन वाढीसाठी उद्योजकाला फायदा होईल. उद्योगसमुहाच्या सर्वांगीण फायदयासाठी त्याचा उद्योगसमुहातील इतरांना स्पर्धातून संधी देण्यात यावी असे आवाहन केले.

जनरल मोटर्स कंपनीचे विनय पाटील म्हणाले, वाहन उद्योग क्षेत्रात इलेक्ट्रीफिकेशन चालकविरहीत वाहने निर्माण करण्याकडे वाहन क्षेत्रातील उद्योजक वाटचाल करीत आहे. काल कलेल्या कामापेक्षा थोडेसे अधिक गुणवत्तेचे, थोडे लवकर व कमी खर्चात केले तर उद्योगसमुह जागतिक बाजारपेठेत टिकाव धरु शकतील. यंत्रे व उपकरणे यांचा उपयोग अधिक चांगले काम करण्यासाठी असायला हवे. उद्योग समुहात आमुलाग्र बदल घडवून आणण्याकरीता प्रत्येक घटकांचा सहभाग महत्वाचा आहे. स्पर्धेमधूनच गुणवत्ता चळवळ वाढीस लागते. आरोग्य, पर्यावरण, शिस्त आदीतही फोरमने लक्ष द्यावे असे आवाहन केले.

सकाळ व दुपारच्या सत्रात झालेल्या कार्यक्रमांची प्रस्तावना फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे व पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर यांनी केले. सुत्रसंचालन विजया रुमाले यांनी तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फोरमचे चंद्रशेखर रुमाले व विजय कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.