Technology News : आता स्मार्टफोन निर्माता Xiaomi ची MI कार !

एमपीसी न्यूज : जगभरात इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने वाढत आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे बहुतेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल पाहून अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये नव्याने उतरत आहे. अशातच आता स्मार्टफोन निर्माता Xiaomi देखील या शर्यतीत उतरणार असल्याचे समजते आहे. कंपनी एक इलेक्ट्रिक कार बनविण्याच्या योजनेवर काम करत असल्याचे समजते आहे.

iFengNews च्या वृत्तानुसार, चीनी कंपनी Xiaomi इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या विचारात आहे. या बद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

हिंदुस्थानी बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. घरगुती वाहन निर्माता टाटा आणि महिंद्रा कंपनीने या सेगमेंटमध्ये आधीच आपली कार आणि स्कूटर लॉन्च केली आहे. दुसरीकडे, ह्युंदाई आणि एमजी मोटर्सनेही या स्पर्धेत आपली इलेक्ट्रिक वाहन उतरवली आहेत. आता अशातच हिंदुस्थानात Xiaomi ला या सेगमेंटमध्ये मोठे आवाहन मिळू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.