BNR-HDR-TOP-Mobile

Pune : आता मॉलमध्ये दुचाकी व चारचाकी पार्किंग होणार फ्री

एमपीसी न्यूज – शहरातील मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी वसूल केले जाणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकीचे वाहनशुल्क भरावे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला भूर्दंड पडत होता. कारण, हे शुल्क अनेक वेळा 20, 40, 60, 80 इतक्या प्रमाणात भरावे लागत असे. मात्र महापालिकेच्या निर्णयामुळे आता नागरिकांच्या खिशावरील हा भार कमी होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

.