Pune : आता पुण्याचे पालकमंत्री कोण? अजित पवार की शशिकांत सुतार?

एमपीसी न्यूज – भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री अजित पवार की शिवसेनेचे शशिकांत सुतार यांची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसची सत्ता येणार असल्याची खमंग चर्चांना उत आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात प्रचारासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार सक्रिय झाले होते. त्यामुळे अजित पवार की शशिकांत सुतार पालकमंत्री कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे.

भाजपचे सरकार आले असते तर चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री निश्चित मानले जात होते. राष्ट्रवादी पुन्हा पुणे जिल्ह्यात सक्रिय होणार आहे. सध्या राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. या सत्तेचा आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. 4 मतदारसंघांत भाजपचा निसटता विजय झाला. तर, 2 मतदारसंघांत भाजपचे मताधिक्यात घट झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.