WhatsApp News : आता तुम्ही लपवू शकता तुमचं पर्सनल व्हॉट्सअ‍ॅप चाट

एमपीसी न्यूज : व्हॉट्सअ‍ॅप नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. हे फीचर आल्यानंतर युजर्सना चॅटिंग करताना खूप फायदा होणार आहे. या द्वारे तुम्ही तुमचं पर्सनल चाट इतरांपासून लपून ठेवू शकणार आहेत. 

व्हॉट्सअ‍ॅपवर आपण मित्रांबरोबर किंवा जवळच्या व्यक्तींसोबत कोणतीही गोष्ट बोलतो. परंतु कुणी मोबाईल मागितला की अडचण होते. आपले पर्सनल चॅट हा व्यक्ती वाचणार तर नाही ना याची आपल्याला भीती असते. त्याचबरोबर व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp web ) वेब उघडं असेल आणि आपल्या आसपास कुणी असेल तर आपले पर्सनल चॅट सामोर येण्याची भीती असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमचं पर्सनल चॅट लपवण्यासाठी एक सोपी पद्धत सांगणार असून तुम्ही हवे तेव्हा हे चॅट लपवू शकता.

व्हाट्सअ‍ॅपच्या ‘Archive’ या फीचरच्या मदतीने तुम्ही आपले चॅट्स किंवा ग्रुप चॅट्सदेखील सोप्या पद्धतीने लपवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला गरज असेल तेव्हा Unarchive देखील करू शकता.

अँड्रॉइड युझर्स या पद्धतीने लपवू शकतात चॅट्स

पहिल्यांदा WhatsApp उघडा.

त्यानंतर चॅट्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे चॅट्स लपवायचे आहेत त्यावर काहीवेळ दाबून धरा.

टॉप बारवरून ‘Archive iconला सिलेक्ट करा.

यामुळे तुमचे चॅट्स Archive होतील आणि स्क्रीनवर चॅट्स दिसणार नाहीत.

अँड्रॉइड फोनवर अशा या पद्धतीने Unarchive करा चॅट

पहिल्यांदा WhatsApp उघडा.

_MPC_DIR_MPU_II

खाली जाण्यासाठी स्क्रीन स्क्रोल करा.

Archived Chats वर क्लिक करा.

ज्या चॅट्सला unarchive करायचं आहे त्यावर क्लिक करा.

वेबवर अशा पद्धतीने लपवा चॅट्स

WhatsApp Web वर सर्व चॅट्स डाव्या बाजूला असतात.

जे चॅट्स तुम्हाला लपवायचे आहे त्यावर बाण क्लिक करून सिलेक्ट करा.

त्याच चॅटवर उजव्या बाजूला ठिकाणी ‘v’ असे चिन्ह दिसेल. ड्रॉपविंडोवर क्लिक करा.

यावर क्लिक केल्यानंतर ‘Archive chat’असे दिसेल.

यामुळे तुमचे chat Archive होईल आणि स्क्रीनवर चॅट दिसणार नाही.

सर्च बारच्या शेजारी असलेल्या तीन टिंबांवर क्लिक केल्यावर Archived पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर अर्काइव्ह केलेली सगळी चॅट्स दिसतील त्यावर क्लिक करून ती Unarchive करता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.