Made in India” iPhone : आता मिळणार “मेड इन इंडिया” iPhone

एमपीसी न्यूज : Apple लवकरच “मेड इन इंडिया” iPhone 13 सादर करणार आहे, यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. चेन्नईजवळील फॉक्सकॉन प्लांटमध्ये iPhone 13 सिरीजचं ट्रायल प्रोडक्शन सुरू झाले आहे.

क्युपर्टिनो-जायंट भारतात आयफोन 13 चे कमर्शियल प्रोडक्शन सुरू करेल अशी अपेक्षा आहे. हे iPhones 2022 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील. 

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अॅपलला त्यांचे सर्व टॉप-सेलिंग स्मार्टफोन मॉडेल्स भारतात बनवायचे आहेत. Apple फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारपेठेसाठी तसेच निर्यातीसाठी iPhone 13 चे उत्पादन सुरू करेल. पुरवठ्याचा आभाव असूनही Apple ने सेमीकंडक्टर चिप्स साठवल्या असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. Apple ने विकत घेतलेल्या सेमीकंडक्टर चिप्सचा जगभरात तुटवडा आहे.

ET च्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात आयफोन 13 चे उत्पादन Apple ला त्यांच्या जागतिक बाजारपेठेत मॉडेलचा पुरवठा सुधारण्यास मदत करेल. विशेष म्हणजे, Apple आधीच भारतातील Foxconn Play येथे iPhone 11 आणि iPhone 12 आणि बंगळुरुतील विस्ट्रॉन प्लांटमध्ये सेकेंड जनरेशन iPhone SE चे उत्पादन करत आहे.

अहवालानुसार, भारतात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोनपैकी 70 टक्के स्मार्टफोन अॅपलचे आहेत, ज्यात iPhone XR, iPhone 11, iPhone 12, iPhone XR आणि iPhone SE यासह सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल समाविष्ट आहेत आणि लवकरच सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या यादीत आयफोन 13 चा समावेश होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.