Nrusinha Jayanti : माऊलींच्या मंदिरात चंदन उटीतून साकारला नृसिंह अवतार

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर नृसिंह जयंतीनिमित्त (Nrusinha Jayanti) चंदन उटीतून ‘श्रीं’चे भव्य नृसिंह अवतारातील वैभवी रूप साकारण्यात आले होते. श्रीचे वैभवी रूप पाहण्यास आळंदी मंदिरात भाविकांनी दर्शनास गर्दी केली.

श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त आळंदीतील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठात देखील विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परंपरेने श्री स्वामी महाराज यांचे संजीवन समाधीवर श्रीक्षेत्रपाध्ये श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, सुधीर गांधी, नितीन गांधी, मुकुंद गांधी परिवाराने परंपरेने परिश्रम पूर्वक श्रींची वैभवी व लक्षवेधी चंदन उटी श्री नृसिंह अवतार स्वामी महाराज मठात साकारली.

Dagadusheth Ganpati: दगडूशेठ गणपती मंदिरात सोमवारी ‘शहाळे महोत्सव’

नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ आणि माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींच्या समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास चैत्रात सुरुवात होते. नृसिंह जयंतीनिमित्त (Nrusinha Jayanti) श्रींच्या संजीवन समाधीवर विविध लक्षवेधी वस्त्रालंकार वापरून स्वामींच्या मठात श्रीचे वैभवी रूप परिश्रमपूर्वक साकारण्यात आले. स्वामी महाराज मठ येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधीवर गांधी परिवाराने चंदन उटी तील वैभवी रूप साकारत पूजा बांधली. विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि पुष्प सजावट करीत श्रींचे रूप लक्षवेधी सजविण्यात आले होते.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरात नृसिंह जयंतीचे धार्मिक महत्व ओळखून नियोजन केले. नृसिंह जयंतीनिमित्त (Nrusinha Jayanti) जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा झाली. यावेळी मंदिरात पुष्पवर्षाव करण्यात आला.

 

परंपरेनुसार मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक व दुधारती झाली. श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला. जन्मोत्सव कीर्तन, आरती,  महानैवेद्य, प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. चैत्र शुद्ध पाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत माऊलींच्या संजीवन समाधीस नियमित चंदन उटी लेप लावण्यात येतो. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नरसिंह जयंती आदी सणांप्रसंगी समाधीस चंदन लेपात विविध अवतार रूपातील पूजा बांधण्यात येतात, अशी माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.

 

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कोरोना प्रादुर्भाव नसल्याने भाविकांनी दर्शनास तसेच उटी पाहण्यासाठी मोठी रांग लावली होती. श्रींना धुपारती झाल्यानंतर मानकरी संतोष मोझे यांचे वतीने हरीजागर झाला. आळंदी देवस्थानच्या वतीने परंपरेने मंदिरात नृसिंह जयंती साजरी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.