NSFDC News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अनुसूचित जातीतील कुटुंबांसाठी ‘एनएसएफडीसी’तर्फे स्माईल योजना

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये अनुसूचित जातीमधील ज्या कुटुंबप्रमुखाचे कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निधन झाले आहे. अशा कुटुंबांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याकरिता एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत ‘स्माईल योजना’ राबविण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशांत गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

अनुसूचित जातीतील 18 ते 60 या वयोगटात असलेल्या कुटुंबप्रमुखाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबाचे पुर्नवसन करण्यासाठी माहिती एकत्रित करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांनी https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर अर्ज भरावा. या योजनेची अधिक माहिती www.mahatmaphulecorporation.com या संकेतस्थळावर नोटीस सेक्शनमध्ये मिळेल.

या योजनेला अधिकाधिक कुटुंबांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.