_MPC_DIR_MPU_III

Pimpri : मोरवाडी न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून एन टी भोसले यांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनतर्फे नवीन न्यायमूर्तींचे स्वागत

एमपीसी न्यूज – मोरवाडी न्यायालयात न्यायाधीश एन टी भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त न्यायाधीशांनी आज (सोमवारी) त्यांचा पदभार स्वीकारला. त्याबद्दल पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर यांनी नवीन न्यायाधीशांचे स्वागत केले. यावेळी मुख्य न्यायाधीश के एम पिंगळे, न्यायमूर्ती ए यु सुपेकर, अॅड. सुनील कड, अॅड. किरण पवार, अॅड. सतीश गोरडे, अॅड. बी के कांबळे, अॅड. देवराम ढाळे, अॅड. दिनकर लाळगे, अॅड. जे के काळभोर, अॅड. मकरंद गोखले, अॅड. प्रशांत अहिरे, अॅड. हर्षद नढे, अॅड. सागर अडागळे, अॅड. निशांत यादव, अॅड.सुनील माने, सचिव अॅड. गोरख कुंभार, अॅड. शशिकांत गावडे, अॅड. पूनम राऊत, अॅड. सविता तोडकर, अॅड. सारिका परदेशी आदी उपस्थित होते.

अॅड. सुनील होनराव, अॅड. अविनाश ववले, अॅड. नारायण थोरात यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. संतोष मोरे यांनी केले. तर आभार अंकुश गोयल यांनी मानले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.