India Corona Update : 199 दिवसातील निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या, 90.51 कोटी लसीकरण 

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून देशात नव्यान वाढ होणा-या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून. सध्या देशात 2 लाख 70 हजार 557 ॲक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. मागील 199 दिवसातील ही निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. तसेच, लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत 90.51 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 22 हजार 842 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 25 हजार 930 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 38 लाख 91 हजार 061 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 30 लाख 94 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

मागील 24 तासांत देशात 244 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. भारतात आजवर 4 लाख 48 हजार 817 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.87 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 57 कोटी 32 लाख 60 हजार 724 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 12 लाख 65 हजार 734 नमूने तपासण्यात आले आहेत.

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 90 कोटी 51 लाख 75 हजार 348 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 73 लाख 76 हजार 846 जणांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.