India Corona Update : तब्बल 18 महिन्यानंतर नवे रुग्ण आणि ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा निचांक 

एमपीसी न्यूज – देशात नव्यानं वाढ होणा-या कोरोना रुग्ण संख्येत घट झाली असून, बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 822 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, 10 हजार 4 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 18 महिन्यानंतर नवे रुग्ण आणि ॲक्टिव्ह रुग्णसंख्येचा निचांक नोंदवण्यात आला आहे. 

देशाचा रिकव्हरी रेट 98.35 टक्के

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 46 लाख 48 हजार 383 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 79 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.35 टक्के एवढा झाला आहे.

 

देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा

देशात सध्या 95 हजार 014 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील तब्बल 554 दिवसांतील ही निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 220 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 73 हजार 757 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 64.94 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 128.76 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.