India Corona Update : एक कोटी 95 लाख बाधितांची संख्या, 1 कोटी 59 लाख कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – भारतात मागील काही दिवसांपासून विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशात मागील 24 तासांत 3 लाख 92 हजार 488 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 95 लाख 57 हजार 457 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 59 लाख 92 हजार 271 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या 33 लाख 49 हजार 644 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 07 हजार 865 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 81.77 टक्के एवढा झाला आहे.

मागील 24 तासांत 3 हजार 689 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 15 हजार 542 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 29 कोटी 01 लाख 42 हजार 339 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 04 हजार 954 चाचण्या शनिवारी (दि.01) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 15 कोटी 68 लाख 16 हजार 031 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.