Nurses Day: परीचारिकांचा पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान

एमपीसी न्यूज – जागतिक परीचारिका दिनानिमित्त (Nurses Day) म्हेत्रे वस्ती येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दवाखान्यातील परीचारिकांना पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळामध्ये दवाखान्यातील परीचारिका व कर्मचारी आणि डॉ. रामनाथ बच्छाव यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Pimpri News: युवा सेनेकडून धर्मवीर चित्रपटाची मोफत तिकीटे

प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमैय्या, वैष्णव चॅरीटेबल व , मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त श्रीराम नलावडे, अंनिस चे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, ग्रंथ दिंडी प्रवर्तक विश्वास पेंडसे, प्रदीप तासगांवकर (अध्यक्ष अंनिस निगडी) व वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टचे पुणे विभागाचे प्रकाश सातव उपस्थित होते.

डॉ. रामनाथ बच्छाव यांनी मिलिंद देशमुख यांच्या विश्व विक्रमाला 29 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांचा हॉस्पिटल (Nurses Day) तर्फे सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.