Pune news: सेवा पंधरवडा निमित्ताने मंथन फाउंडेशनच्या वतीने बुधवार पेठ येथे पोषण आहार वाटप

एमपीसी न्यूज : सेवा पंधरवडा निमित्ताने मंथन फाउंडेशनच्यावतीने बुधवार पेठ येथे पोषण आहार वाटप करण्यात आले आहे.
मंथन फाउंडेशन, महान एनजीओ फेडरेशन व भगीरथ तापडिया ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. लोकेनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत सरकारी कार्यलयास निर्देश दिले आहेत. त्या प्रेरणेतून सामाजिक संस्था देखील महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून प्रेरित होऊन शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राभर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंढरवडा साजरा करत आहेत.
मंथन फाउंडेशनने या निमित्त बुधवार पेठ येथील एचआयव्ही सह जगणाऱ्या ९० महिलांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. या घटकाला समाजाने आदराने पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात ७२ ठिकाणी आपण सेवा पंधरवडा हा उपक्रम करत आहोत.

राजेंद्रजी तापडिया यांच्या भगिरथ तापडिया ट्रस्टच्या माध्यमातून पोषण आहार महिलांना देण्यात आला. आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून या महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे राजेजी शास्त्रेय, पोलीस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के , भगिरथ तापडिया ट्रस्टचे प्रतिनिधी संदेश मानकर, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे , गणेश बाकले, पुणे मनपा च्या माजी नगरसेविका अस्मिताताई शिंदे , अक्षयमहाराज भोसले आणि मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट, दीपक निकम व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांनी ध्यान शिबिराची अनुभूती घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.