NVS-1 : भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार ; इस्रोतर्फे एनवीएस-1 या उपग्रहाचे प्रक्षेपण

एमपीसी न्यूज- इस्रोतर्फे श्रीहरीकोटामधील अंतराळ केंद्रावरून भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम करणाऱ्या एनवीएस-1 या उपग्रहाचे प्रक्षेपण आज सकाळी (29 मे) करण्यात आले.सतीश धवन अवकाश केंद्रातून जीएसएलव्ही एफ- 12(GSLV-F12) या रॉकेटमधून एनवीएस-1 (NVS-1) या उपग्रहाने अंतराळात भरारी घेतली आहे.  या उपग्रहाचं वजन दोन हजार 332 किलो इतकं आहे.

Pune : काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

या उपग्रहाचा प्रमुख उद्देश अचूक वेळेची सुविधा, रेंज आणि नेव्हिगेशन क्षमता प्रदान करणे हा आहे, तसेच हा उपग्रह पाकिस्तान आणि चीन सीमेवर लक्ष ठेवण्यास देखील मदत करणार आहे.त्यामुळे आता एनवीएस-01  या उपग्रहाच्या माध्यमातून सीमेवर या दोन्ही देशाकडून करण्यात येणाऱ्या कुरघोडींना आता चोख उत्तर देण्यास भारत आणखी सक्षम होऊ शकतो.

इस्रोकडून विकसित करण्यात आलेली ही स्वदेशी नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे. हा सात उपग्रहांचा समूह असून, अंतराळात ग्राऊंड स्टेशन म्हणून हे काम (NVS-1) करेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.