Pimpri : नगर येथे ओबीसी मेळावा

एमपीसी न्यूज –  अडचणीत एकसंध कसे राहायचे याचा आदर्श मराठा समाजातील  बांधवाकडून  घ्यावा असे  मत  शिवसेना राज्य संघटक व जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी ओबीसी इंडिया मेळाव्यात नगर येथे केले.

नगर येथे ओबीसी इंडिया मेळावा नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे नेते एकनाथ खडसे, धनगर समाजाचे नेते , माजी आमदार प्रकाश शेंडगे, शिवसेना आमदार नरेंद्र दराडे, शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे आदी उपस्थित होते.
गोविंद घोळवे म्हणाले की, ओबीसी समाज महाराष्ट्रात खूप मोठा आहे या समाज्याला बरोबर घेतल्याशिवाय कोणताच पक्ष सतेत येऊ शकत नाही.  परंतु आपल्यामध्ये गट तट खूप पडलेत्यामुळेच छगन भुजबळ असो अथवा एकनाथ खडसे यांना  राजकीय किंमत मोजावी लागली .

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील 15 तरुण बांधवानी आपले जीवन संपविले आत्महत्या करणे महाराष्ट्राला शोभणीय बाब नकीच नाही मात्र समाजासाठी  त्यांनी केलेले बलिदान खूप मोठे आहे अशा शहिदाना आज आपण ओबीसी व्यासपीठावर श्रध्दांजली वाहून हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा आहे हे दाखवून द्या आणि एकसंध व्हा केवळ सत्ता मान  प्रतिष्ठा  यासाठी जगण्यापेक्षा समाज्यासाठी जगा कोणाचा धिकार न करता सगळ्यांना बरोबर घेऊन चला ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे आमचा अजिबात विरोध नाही

यावेळी  युपीएससी व एमपीसी  परीक्षेत पास झालेल्या विध्यार्थ्यांनचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वाती मोराळे रत्नाकर मोराळे यांचं आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.