Talegaon Crime News : अर्धनग्न अवस्थेत महिलेकडे पाहून अश्लील वर्तन; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पती कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर महिला घराच्या मागच्या बाजूला कपडे धुवत होती. त्यावेळी एका व्यक्तीने अर्धनग्न अवस्थेत तिथे येऊन तिच्यासमोर अश्लील वर्तणूक करून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 15) सकाळी कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

सचिन मरकळ (वय 40, रा. तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती सोमवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित महिला घराच्या मागच्या बाजूला कपडे धुवत होती.

त्यावेळी आरोपी अर्धनग्न अवस्थेत तिथे आला. त्याने पीडित महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.